Surrogacy Meaning in Marathi | सरोगसी म्हणजे काय | Ivf meaning in Marathi

नमस्कार मित्रानो, आज आपण सरोगसी म्हणजे काय? (Surrogacy Meaning in Marathi) आणि सरोगसी बद्दल असलेले समाजाचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Table

सरोगसी म्हणजे कायSurrogacy Meaning in Marathi :

आज भारतात आणि जगात मूल जन्माला घालण्यासाठी सरोगेट आईचा वापर करण्या विषयी अजूनही बरेच वाद आहेत. तसेच कायदेशीर प्रक्रिया देखील अवघड आहे. कारण प्रत्येक भारतातील राज्या – राज्या नुसार ती बदलते. तरीही, प्रजनन समस्या किंवा इतर कारणांमुळे, सरोगसी हा तुमच्यासाठी आणि तुमच्या जोडीदारासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. सरोगसी कश्या प्रकारे कार्य करते आणि ते तुमच्या साठी योग्य आहे कि नाही, तेच आपण आज या लेखात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला बघू Surrogacy Meaning in Marathi आहे तरी काय…

सरोगेट मदर म्हणजे काय : Srrogate mother meaning in marathi:

सरोगेट मदर याचा अर्थ अशी स्री जी स्वतःच्या गर्भाशयात ज्या जोडप्याना बाळ होत नाही त्यांच्यासाठी बाळ वाढवते. या प्रक्रिये मध्ये ही माता आपले गर्भाशय ज्या जोडप्यांना बाळ होत नाही त्यांना भाड्याने देते. ज्यामुळे अश्या दांपत्याना पालकत्वाचा आनंद घेता येतो. हि प्रक्रिया वाटते तितकी सोपी नसते, परंतु हा पर्याय आज सार्वत्रिक रित्या कायद्याच्या चौकटीत राहून वापरला जातोय.

विविध देशात वेगवेगळ्या कायद्यांचा आधार घेऊन सरोगशी हा पर्याय मोठ्या प्रमाणत वापरला जातोय. बरेच दापत्य मुल दत्तक घेण्या ऐवजी सरोगशीचा पर्याय निवडतात. आज विचार केल्यास सर्वाधिक सरोगेट मदर भारतात आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भारतात सरोगेट माता मिळण्यात जास्त अडचणीना सामोरे जावे लागत नाही, तसेच भारतात सरोगेट मदर ह्या कमी पैसे देऊन उपलब्ध होतात. तसेच भारतात कायद्याचे थितील निर्बंध असल्याचे पहावयास मिळत असल्याने कायद्याच्या कमी अडचणी येतात. याच गोष्टीमुळे परदेशातील बरेच जोडपे भारतात सरोगसीचा पर्याय निवडतात. हे असेच चालू राहिल्यास भारत एक दिवस सरोगसी ची राजधानी नक्कीच बनेल.

सरोगसी चा वापर कोण करतात:

सरोगसी चा पर्याय निवडण्याची अनेक कारणे असतात. त्यामध्ये मुख्यत्वे ज्या स्रीला मुल जन्माला घालण्यासाठी शारीरिक किवा इतर तांत्रिक अडचणी निर्माण होत असेल तर सरोगसी पर्याय निवडला जातो. बऱ्याच स्रीयांना जन्मताच गर्भाशय नसते किवा गर्भाशयाच्या समस्या असतात त्या स्रीया सरोगसी चा पर्याय निवडतात. तसेच बऱ्याच वेळेस मिसकॅरेज झाल्यामुळे मुल जन्माला घालणे शक्य होत नाही, त्या स्रीया सरोगसी चा पर्याय निवडतात. यामध्ये अजून बरेच कारणे असू शकता.

सरोगसी चे प्रकार : Type of surrogacy in marathi:

सरोगसीचे पारंपारिक सरोगसी आणि जेंस्टेशनल सरोगसी असे दोन प्रकार पडतात.

पारंपारिक सरोगसी:

या प्रकारात सरोगेट मातेचा सबंध बाळ हवे असलेल्या जोडप्यातील पुरुष व्यक्तीशी जाणीवपूर्वक किवा कृत्रिम पद्धतीने आणला जातो. या प्रकारात सरोगेट मदर तिच्या स्व:ताच्या अंडाशयाचा वापर करते. या प्रकारे गर्भधारणा करून मुल जन्माला घालण्याच्या प्रक्रियेला पारंपारिक सरोगसी म्हटले जाते. परंतु या प्रकारे मुल जन्माला घातल्या मुळे जोडप्यातील स्रीचा त्या बाळाशी कोणताच अनुवंशिक संबंध येत नाही. त्यामुळे पारंपारिक सरोगसी कायद्याच्या दृष्टीकोनातून बेकायदेशीर असते.

जेंस्टेशनल सरोगसी : Ivf meaning in Marathi :

जेंस्टेशनल सरोगसी प्रकारामध्ये सरोगेट माता दुसर्‍या व्यक्तीसाठी गर्भधारणा करण्यास सहमत असते. या मध्ये जोडप्या मधील स्री तिचे स्रीबीज व तिच्या पतीचे शुक्राणू वापरूनआयव्हीएफ (IVF) पद्धती द्वारे मिलन घडवून तो गर्भ सरोगेट मातेच्या गर्भाशयात सोडण्यात येते, किंवा त्या स्त्रीचे स्त्रीबीज व तिच्या पतीचे शूक्राणू जीआयएफटी Gamete Intra-Fallopian Transfer या पद्धतीने सरोगेट मातेच्या गर्भाशयात सोडण्यात येतात. या पद्धतीने सरोगेट मातेच्या गर्भाशयात गर्भधारणा होउन नऊ महिने सरोगेट मदर बाळाचे तिच्या गर्भाशयात संगोपन करते. या मध्ये जोडप्यातील स्री त्या बाळाची अनुवंशिक माता असते.

काही करणा मुळे मूल पाहिजे असलेल्या स्त्रीचे स्त्रीबीज वापरणे शक्य नसल्यास स्त्रीबीज दात्या कडून स्त्रीबीज घेण्यात येते. हे बाळ या महिलेबरोबर जैविक संबंध सामायिक करेल, परंतु ती बाळाची अनुवंशिक माता होउ शकत नाही. हे कायदेशीर रित्या सुद्धा योग्य असते.

सरोगेट मदर कशी शोधावी:

१) सरोगसी साठी सरोगेट मदर शोधतांना महत्त्वपूर्ण गोष्टी विचारात घेणे आवशक आहे.

२) सरोगेट मातेचे वय किमान २१ वर्षांचे असणे आवशक.

३) आधीच किमान एका निरोगी बाळाला जन्म दिला असेल तर, गर्भधारणा आणि बाळंतपणातील वैद्यकीय जोखीम आणि नवजात मुलाशी नातेसंबंधाच्या भावनिक समस्यांची जाणीव असते. त्यामुळे बाळ निरोगी जन्माला येऊ शकते.

४)सरोगेट मदर शोधतानी सरोगेट मदर चे पारिवारिक गोष्टीच्या मागोवा घेणे आवशक.

५) सरोगेट मदर शोधतानी सरोगेट मदर ची शारीरिक स्वास्थाचा विचार करावा.

६) सरोगेट मदर शोधतानी सरोगेट मदर सोबत चर्चा करणे महत्वाचे आहे.

७) सरोगेट मदर शोधतानी सर्वात प्रथम स्वताच्या परिवारातील व्यक्ती तयार असल्यास त्या व्यक्तीची निवड करावी.

८) सरोगेट मदर शोधतानी पालकांच्या हक्कांबद्दल उद्भवणाऱ्या जटिल कायदेशीर समस्यांपासून वाचायचे असल्यास परिवारातील व्यक्ती सरोगेट माता होण्मयास असेल तर महत्वपूर्ण ठरू शकते.

सरोगेट मदर शोधतानी घ्यावयाची काळजी:

१) सर्वात प्रथम कायदेशीर गोष्टीचा विचार करणे आवशक आहे.

२) सरोगेट मदर शोधतानी सरोगेट मदर सोबत आर्थिक बाबीचा विचार करणे आवशक.

३) सरोगेट मदर शोधतानी कायद्याच्या चौकटीत राहून सरोगेट मदर सोबत करार करणे आवश्यक आहे.

४) ज्या देशात सरोगेट मदर शोधत आहात त्या देशातील असलेले कायदे काय म्हणतात ते आपल्या वकीला मार्फत समजून घेणे.

५) सध्या सरोगेट मदर कोण असू शकते याबद्दल कोणतेही नियम नाहीत. परंतु तज्ञ सरोगेट माता कशी निवडावी याबद्दल आपणास सांगू शकतात.

६) या कामात बऱ्याच एजन्सी तुम्हाला मदत करू शकतात.

७) गर्भधारणेतील त्यांची काय भूमिका आणि जबाबदाऱ्यां असल्याबद्दल करारावर स्वाक्षरी करा, जसे की जन्मपूर्व काळजी आणि तुम्हाला जन्मानंतर बाळ देण्यास सहमती असणे आवशक.

या सर्व गोष्टी आपणास नक्कीच फायदेशीर होऊ शकतात.

आज आपण सरोगसी म्हणजे काय? (Surrogacy Meaning in Marathi) या विषयावर चर्चा केली. आपले Surrogacy Meaning in Marathi या लेखाबद्दल काही अभिप्राय असल्यास कमेंट करून नक्की कळवा.

आपण हे पण वाचू शकता…

१) Sip meaning in Marathi.

२) भारतातील राज्य व राजधानी.

Leave a Comment