मुळव्याध म्हणजे काय? | मुळव्याध वर घरगुती उपाय | मुळव्याध आहार काय घ्यावा.

मित्रानो नमस्कार, आज आपण या लेखात मुळव्याध म्हणजे काय? मुळव्याध वर घरगुती उपाय, मुळव्याध आहार काय घ्यावा, मुळव्याध ची लक्षणे आणि उपाय काय काय उपलब्ध आहे याची सविस्तर माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला बघू तर मुळव्याध म्हणजे काय आहे…

Table

मुळव्याध म्हणजे काय:

मूळव्याध हि एक शारीरिक समस्या आहे. ज्यामध्ये गुदद्वाराच्या आतल्या व बाहेरच्या भागातील रक्तवाहिन्यांना फुगल्या व सुजल्यामुळे त्या दुखतात सोबत त्यापासून वेदना पण होत असतात. अश्या व्याधीस मूळव्याध असे म्हणता.

या व्याधीत बसण्यास पण खूप त्रास होत असतो. यामुळे या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर स्वरूपाच्या शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे आयुर्वेदात असलेले काही उपाय तसेच काही सामान्यपणे प्रचलित असलेली औषधे आज आपण माहित करून घेऊया. तसेच त्या सोबत मूळव्याध झाल्यास कोणकोणत्या उपाय योजना घेतल्या पाहिजे त्या समजून घेण्याचा प्रयत्न करू.

मुळव्याधचे प्रकार:

मूळव्याध हे दोन प्रकारचे असतात – रक्तरंजित ढीग आणि खराब मूळव्याध.

१) रक्तरंजित ढीग:

या प्ररकारामध्ये रक्तस्त्राव होत राहतो पण वेदना होत नाही.

२) बद्धकोष्ठता:

रेक्टल स्नायू खराब झाल्यामुळे मल बाहेर टाकण्यात अडचण होते त्यामुळे बद्धकोष्ठता पोटात होते आणि पोट साफ न झाल्याचे सतत जाणवत असते. हा आजार सर्वसाधारणपणे ४५ ते ६५ वर्षांच्या दरम्यान सामान्यपणे जाणवतो.

मुळव्याधाची लक्षणे:

१) शौचाला गेल्यावर सतत रक्तस्त्राव होणे हे मुळव्याधाचे प्राथमिक लक्षण असते. अशा प्रकारात रक्तस्राव हे वेदनारहित असतात. असे लक्षण रुग्णाच्या शौच खूप खडक किंवा मोठी झाल्यास त्रास जाणवतो.

२) गुदद्वारातून म्यूकस वारंवार सुटणे.

३) मल नि:सारना नंतर सुद्धा पोटात मल असल्याचे सतत जाणवणे.

४) गुदद्वाराजवळ वेदना व खाज जाणवणे ज्यामुळे तो भाग लालसर होणे.

५) मल नि:सारना करतेवेळी वेदना होणे.

मुळव्याध झाल्यास कोणती काळजी घ्यावी:

मूळव्याध झाल्याचे समजल्यास आणि तीव्र त्रास जाणवत असेल तर काही काळजी घेणे गरजेचे असते.

१) आंघोळीला गेल्यावर बसून अंघोळ करणे.

२) मलनिःसारण केल्यानंतर दिवसातून ३ ते ४ वेळेस कोमट पाण्यात २० ते २५ मिनिटे बसल्यास वेदना कमी होण्यास मदत होते.

३) मूळव्याध असलेल्या व्यक्तीने बसते वेळेस मऊ पृष्ठभागावर बसने फायद्याचे असते. त्यामुळे वेदना आणि सूज कमी होण्यास नक्की मदत होते.

४) मलनिःसारण करण्यासाठी कमोड चा वापर करत असाल तर पाय थोडे उंच करून बसल्यास मलनिःसारणास मदत होते व वेदना कमी होतात.

मुळव्याध झाल्यास आहार काय घ्यावा:

१) मूळव्याध झालेल्या लोकांनी आहारात हिरव्या पालेभाज्याचा जास्त वापर करावा. हिरव्या पालेभाज्या मध्ये अँटी ऑक्सिडंट आणि पोषक तत्व असतात. ज्याचा मूळव्याध झालेल्या व्यक्तींना फायदा होतो. अश्या लोकांनी काकडी, पालक, कोबी, फूलकोबी, गाजर, कांदा याचा वापर करावा.

२) मूळव्याध झालेल्या व्यक्तीने बाहेरचे जेवण टाळले पाहिजे, कारण हॉटेल मधील पदार्थात मसाल्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्रास जास्त जाणवतो.

३) मूळव्याध झालेल्या व्यक्तीने मासांहार टाळले तर अतिशय उत्तम असते. जेणेकरून तेलकट पदार्थ कमी घेतले जातील.

मुळव्याध वर घरगुती उपाय:

येथे तज्ञांनी काही सुचवलेले घरगुती उपाय देण्यात आले आहे जे मूळव्याध झालेल्या व्यक्तीला फायदेशीर असू शकतात.

१) गरम पाण्याची आंघोळ:

मूळव्याध झालेल्या व्यक्तीने गरम पाण्याने अंघोळ केल्यास वेदना कमी होण्यास मदत होते. यामुळे सूज आणि खाज सुटणे कमी होते.

२) नारळ तेलाचा उपयोग:

नारळ तेलाचा उपयोग मूळव्याध झालेल्या भागावर लावल्यास वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होते.

३) कोरफड:

मूळव्याध झालेल्या व्यक्तीने कोरफड जेल उपयोग बाधित भागावर लावल्यास चांगला फायदा मिळतो. कोरफडीत विवध आजारावर एक गुणकारी उपाय मानला जातो. दिवसातून तीन किवा चार वेळेस या जेल चा उपयोग केला पाहिजे.

४) आईस पॅक:

मूळव्याध झालेल्या व्यक्तीला आईस पॅक खूप फायदा देवू शकते. मूळव्याध झालेल्या जागेवर आईस पॅक लावला पाहिजे. आईस पॅक आपण प्लास्टिक पिशवीत टाकून बाधित भागावर लावल्यास वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होते. प्रती दिन ४ ते ५ वेळेस याचा वापर करणे योग्य असेल.

टीप:

काही व्यक्तींना कोरफड ची अलर्जी असते त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपयोग करावा.

मूळव्याध मलम:

मूळव्याध वर घरगुती उपायांनी उपचार केल्यास या आजारावर मात दिली जाऊ शकते. परंतु ते सुरवातीच्या अवस्थेमध्ये असले पाहिजे. रुईच्या पानातील चिक काढान यात हळद मिसळून पेस्ट तयार करा. हा मलम मूळव्याध नियंत्रित करण्यास खूप मदत करतो.

मूळव्याध औषध:

लिंबू कापून ५ ग्रॅम काथ बारीक वाटून त्यात अर्ध्या-अर्ध्या कापलेल्या लिंबावर लावावा व रात्रभर तसाच ठेवावा. नंतर सकाळी दोन्ही तुकडे चोखावे. रक्तस्राव बंद करण्यासाठी हे उत्तम औषध आहे, १५ ते २० दिवस दररोज हा उपाय करावा. तसेच झेंडूची १० पाने व ३ ग्रॅम काळी मिरी पाण्यात वाटून चांगली गाळून प्यायल्याने मुळव्याधमधून रक्त येणे थांबल्याचे अनुभवातून शिद्ध झाले आहे.

पतंजली मूळव्याध औषध:

अर्शकल्प वटी हा मूळव्याध साठी आयुर्वेदिक उपाय आहे. हे हर्बल अर्कच्या मिश्रणापासून तयार केले जाते. ज्यामध्ये आजार बरे करण्याची व वेदना कमी करण्याची क्षमता आहे. त्रिफला चूर्णाचा वापर हा एक आयुर्वेदिक उपाय आहे जो बद्धकोष्ठता आणि पोटाच्या समस्यांकरिता अतिशय फायदेशीर आहे.

बालाजी तांबे याचे मुळव्याध औषध:

मूळव्याध झालेल्या व्यक्तीला त्रास अतिशय वेदनाजनक असतो. यात शरीर व मन दोन्ही त्रस्त होऊन जातात. रक्‍त पडत असले तर व्यक्‍ती अगदीच कमजोर होत जातो. यावर चरकसंहितेमध्ये खालील उपाय सुचविलेला आहे. चांगेरी, नागकेशर व नीळकमळ यांनी संस्कारित लाह्या पाण्यामध्ये शिजवून तयार केलेली पेज मूळव्याधीतून होणारा रक्‍तस्राव ताबडतोब थांबवते.

कुवेडा चे सिरप आणि गोळ्या:

क्यूवेडा पाइल्स सिरप (४५० मिली) आणि पाइल्स गोळ्या (६०टैब्स) या अतिशय उपयुक्त असल्याने बऱ्याच लोकांना मूळव्याध सारख्या व्याधीपासून त्रास कमी झाल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांना शस्रक्रिया करण्याची गरज आलेली नाही.

क्यूवेडा गोळ्यांचा डोस– जेवणा केल्यानंतर सकाळी २ गोळ्या आणि रात्रीच्या जेवणानंतर 2 गोळ्या.

क्यूवेडा सिरपचा डोस– जेवणा केल्यानंतर सकाळी आणि रात्रीच्या जेवणानंतर अर्धा कप पाणी घेऊन 3 चमचे.

आपणास मुळव्याध आजारा बद्दल हा लेख कसा वाटला ते आपण कमेंट च्या माध्यमातून तुमी आपला अभिप्राय देऊ शकता.

सूचना:

हे विचार डॉक्टरांचे नसल्याने आपण उपचार घेतानी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

आपण हे पण वाचू शकता…

१) सरोगसी म्हणजे काय?

२) भारतात किती राज्य आहे.

Leave a Comment